महाराष्ट्र शासन | GOVERNMENT OF MAHARASHTRA

आमची यशोगाथा

पोखरण हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हातील डहाणू तालुक्यातील एक छोटसे गाव आहे., सन २०११ च्या जणगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ६२२ आहे.

गावामध्ये अंगणवाडी केंद्र १, समाज मंदिर २, सभामंडप-१   तसेच पिण्याच्या पाण्या साठी विहरी व बोअरवेल  उपलब्ध आहेत अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत. तसेच पद्मावरी  देवीचे मोठे मंदिर आहे.

गावातील बहुतांश लोकांचा  मुख्य व्यवसाय हंगामी भात शेती व मिरची पीक व फळबाग लागवड आहे.

पोखरण ग्रामपंचायती मध्ये विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत पात्र लाभार्थीना लाभ दिला जात आहे.

सन २०२४  मध्ये टिबी मुक्ता पंचायत पुरस्कार मिळाला आहे, ग्रामपंचायतीचे सर्व निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

भौगोलिक स्थान

पोखरण हे गाव डहाणू  तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १०  कि. मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ  हे आर असून  ग्रामपंचायती मध्ये महसूल गाव १, ३  वार्ड आहेत.एकूण १९०  कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ६२२ आहे.त्यामध्ये ३०५  पुरुष  व   ३१७  महिला यांचा समावेश आहे. गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने समुद्र किनार्‍या लगत आहे.तसेच पोखरण गावाला नळ पाणी पुरवठा होत असतो . गावात शेती करण्यासाठी शेतात बोअरवेल  चे पाणी  वापरले जाते. व  हे गाव मिरची,केळी,आंबा ,चिंच  उत्पादनात प्रसिद्ध आहे . येथे हवामान दमट उष्ण कटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३७°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १७°से. पर्यंत खाली येते.पोखरण  क्षेत्रातील मिरची,केली ,आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पोखरण येथे गाव म्हशी यांचेही पालन केले जाते व दुधाचा व्यवसाय  केला जातो. व यांच्या पासून मिळणार्‍या शेणाचा उपयोग शेतात खत म्हणून वापर केला जात असतो.

लोकजीवन

पोखरण गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून केळी, मिर्ची ,आंबा, व हंगामी भात पिक मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण  गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो.  लोकांचे लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

संस्कृती परंपरा

पोखरण महाराष्ट्रातील एक सुंदर व छोटासा खेडे गांव पूर्वेला सह्याद्री पर्वत, पश्चिमेला अथांग अरबी समुद्र, उत्तेला डहाणूची खाडी आणि दक्षिणेला तूप खाडी अशा सुंदर व समृद्ध चतुरसिमा लाभलेला पोखरण गांव आणि गावाच्या मध्याभागी स्थानपत्र असलेली व नवसाला पावणारी स्वयंभू पद्मावती (भवानी) माता सर्व गावावर शुभ आशिर्वदाचा वर्षाव करीत आहे आणि गावाच्या उत्तरेकडे पूर्वाभीमुख बसलेली श्री. महालक्ष्मी माता सर्व शेतकरी बांधवांना शेती बागायतीमध्ये भरगोस पीक देते. म्हणूनच या पोखरण गावांत ब्राह्मण, कुणबी, आदिवासी, हरीजन व मांगेला या पांच समाजाची जनता पांडवाप्रमाणे सुखाने नांदत आहे.] गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, सांकृतिक कार्यक्रम,आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात. यामुळे पोखरण गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

महालक्ष्मी मंदिरगावाच्या उत्तर  च्या भागात असलेले हे पुरातन काळातील मंदिर आहे .

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


165
622
305
317

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo