आमची यशोगाथा
पोखरण हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हातील डहाणू तालुक्यातील एक छोटसे गाव आहे., सन २०११ च्या जणगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ६२२ आहे.
गावामध्ये अंगणवाडी केंद्र १, समाज मंदिर २, सभामंडप-१ तसेच पिण्याच्या पाण्या साठी विहरी व बोअरवेल उपलब्ध आहेत अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत. तसेच पद्मावरी देवीचे मोठे मंदिर आहे.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय हंगामी भात शेती व मिरची पीक व फळबाग लागवड आहे.
पोखरण ग्रामपंचायती मध्ये विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत पात्र लाभार्थीना लाभ दिला जात आहे.
सन २०२४ मध्ये टिबी मुक्ता पंचायत पुरस्कार मिळाला आहे, ग्रामपंचायतीचे सर्व निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
भौगोलिक स्थान
पोखरण हे गाव डहाणू तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १० कि. मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ हे आर असून ग्रामपंचायती मध्ये महसूल गाव १, ३ वार्ड आहेत.एकूण १९० कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ६२२ आहे.त्यामध्ये ३०५ पुरुष व ३१७ महिला यांचा समावेश आहे. गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने समुद्र किनार्या लगत आहे.तसेच पोखरण गावाला नळ पाणी पुरवठा होत असतो . गावात शेती करण्यासाठी शेतात बोअरवेल चे पाणी वापरले जाते. व हे गाव मिरची,केळी,आंबा ,चिंच उत्पादनात प्रसिद्ध आहे . येथे हवामान दमट उष्ण कटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३७°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १७°से. पर्यंत खाली येते.पोखरण क्षेत्रातील मिरची,केली ,आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पोखरण येथे गाव म्हशी यांचेही पालन केले जाते व दुधाचा व्यवसाय केला जातो. व यांच्या पासून मिळणार्या शेणाचा उपयोग शेतात खत म्हणून वापर केला जात असतो.
लोकजीवन
पोखरण गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून केळी, मिर्ची ,आंबा, व हंगामी भात पिक मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. लोकांचे लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.